narayan ranes strategy for loksbaha | Sarkarnama

#Loksabha2019 आक्रमक राणेंमधील वडिल मुलाच्या खासदारकीसाठी बनला मवाळ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने जिल्ह्यात दोन मेळावे घेऊन लोकसभेच्या प्रचाराचे जणू रणशिंगच फुंकले. विकास काय ते दाखवून देऊ, आम्हाला एकदा संधी द्या, अशी विनवणी कोकणचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केली. नीलेश राणेच आगामी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असल्याचे त्यानिमित्ताने स्पष्ट केले. 

रत्नागिरी : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने जिल्ह्यात दोन मेळावे घेऊन लोकसभेच्या प्रचाराचे जणू रणशिंगच फुंकले. विकास काय ते दाखवून देऊ, आम्हाला एकदा संधी द्या, अशी विनवणी कोकणचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केली. नीलेश राणेच आगामी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असल्याचे त्यानिमित्ताने स्पष्ट केले. 

मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्‍वासन मिळाल्याने नारायण राणेंनी सेनेला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. साधारण अकरा ते बारा वर्षे कॉंग्रेसच्या मुरब्बी राजकारणाचा सामना केला. अक्षरशः त्यांना झुलवत ठेवले. हायकमांडला जाग आणण्यासाठी वारंवार त्यांनी बंडही केले. तरी त्यांच्याकडे पक्षाने लक्ष दिले नाही. कॉंग्रेसने शब्द देऊन आपली फसवणूक केली, असे स्पष्ट करीत राणे यांनी कॉंग्रेसलाही रामराम ठोकला. सर्व पक्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्याने कोणत्या पक्षात जाण्याऐवजी आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी स्वतंत्र पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. मात्र, त्यासाठी त्यांनी भाजपची हातमिळवणी करून खासदारकी आपल्या पदरात पाडून घेतली. चिपळूण, रत्नागिरीत स्वाभिमान पक्षाने मेळावे घेऊन आपली ताकद दाखविण्याचा चांगला प्रयत्न केला. मतदारांनी एकदा संधी देण्याचा मवाळकीचा सूर नीलेश राणे आणि नारायण राणे यांनी आळवून लोकसभेच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. 

संबंधित लेख