narayan rane said raj udhav appose maratha reservation | Sarkarnama

मराठा आरक्षणाला उद्धव-राजचा विरोधच, नारायण राणेंचा आरोप 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विरोध आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी आज केली. 

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विरोध आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी आज केली. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना राणे यांनी राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाबाबत भाष्य केले आहे. एकीकडे त्यांनी विरोधक मराठा आंदोलन पेटवित असल्याचे सांगतानाच दोघा ठाकरे बंधुंनाही लक्ष्य केले आहे. राज यांच्यापेक्षा त्यांनी उद्वव ठाकरेंचा त्यांनी समाजार घेतला. ते म्हणाले, की शिवसेनेला म्हणून मराठा समाजातील पोरं चालतात पण, त्यांना आरक्षण द्यायचे म्हटले की त्यांना विरोध करतात. मराठा आंदोलनाला विरोध करण्यासाठी राज आणि उद्धव हे आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची भाषा करतात. त्यांचा मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोधच आहे. उद्धव आणि राज यांच्या पोटात एक आणि ओठात एक आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नारायण राणेंना दिवसात तीन तीन वेळा भेटतात मात्र आम्हाला वेळ देत नाही शिवसेनेची तक्रार आहे याकडे लक्ष वेधले असता राणे म्हणाले, की माझी मुख्यमंत्र्यांकडे वटच आहे. त्यामुळेच ते तीनवेळा मला भेटतात. माझी वट शिवसेनेपेक्षा जास्त आहे. शिवसेनेला कुठलंच मत नाही. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख