narayan rane is our patry: nitiesh rane | Sarkarnama

 नारायण राणे हाच आमचा पक्ष : नितेश राणे 

सुचिता रहाटे 
रविवार, 20 ऑगस्ट 2017

मुंबई : नारायण राणे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चेला उधान आले असतानाच नारायण राणे हाच आमचा पक्ष असा आपला 'वॉट्‌स ऍप डीपी' नितेश राणे यांनी ठेवला आहे. यावरूनच नितेश राणे हे सुद्धा वडिलांबरोबर भाजपमध्ये जाणार हे स्पष्ट होत आहे. 

"आमचा पक्ष राणेसाहेब : तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही ठरवाल ते धोरण' अशा मजकुराची इमेज आपल्या फेसबुक पेज वर पोस्ट करून अप्रत्यक्षरित्या भाजप प्रवेशाबाबत नितेश राणे यांनी वाचा फोडली आहे. सध्या नारायण राणे आणि नितेश राणे यांनी भाजप प्रवेशाबाबत चुप्पी धरली आहे. परंतु राणे कुटुंबियांनाही भाजप प्रवेशाचे वेध लागले असून लवकरात लवकर भाजपमध्ये जाण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते. नारायण राणे आपले दोन्ही मुलांच्या राजकीय कारकिर्दीसाठी धडपड करीत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. तसेच अनेक कॉंग्रेसमधील राणे समर्थक त्यांच्या पाठोपाठ भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्‍यताही सूत्रांकडून वर्तिविली जात आहे. 

कॉंग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे सुध्या भाजपच्या वाटेवर असून याची पुष्टी कॉंग्रेसमधील नेतेमंडळी करत आहेत. त्यामुळे राणे भाजपात गेले तर आपल्या समर्थकांचा लवाजमा घेऊन जाणार अशी चिन्हे दिसत आहेत. 

संबंधित लेख