Narayan Rane Nitesh Rane Maharashtra News | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

राणे पिता-पुत्राची मच्छिमारांच्या विषयावर निव्वळ स्टंटबाजी : दामोदर तांडेल

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 जुलै 2017

अनेक वर्षे सत्तेत असलेले काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मच्छिमारांसाठी कोणतीही योजना आतापर्यंत राबविली नाही. तसेच खासदार असताना निलेश राणे यांनी केंद्रातल्या मत्स्यव्यवसाय विकास योजनेतून मच्छिमारांसाठी निधी का आणला नाही. - दामोदर तांडेल

मुंबई : राणे पिता-पुत्राने मच्छिमारांसाठी काय केले? आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यावर मासे फेकणे ही निव्वळ स्टंटबाजी आहे, असा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केला आहे.

अनेक वर्षे सत्तेत असलेले काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मच्छिमारांसाठी कोणतीही योजना आतापर्यंत राबविली नाही. तसेच खासदार असताना निलेश राणे यांनी केंद्रातल्या मत्स्यव्यवसाय विकास योजनेतून मच्छिमारांसाठी निधी का आणला नाही. नितेश राणे यांना मच्छिमारांचा आत्ताच का पुळका आला आहे, अशा अनेक प्रश्नांवर राणे कुटुंबियांवर तांडेल यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार टीका केली.

परप्रांतीय नौका व पर्सनीन नौकांच्या विरोधात नितेश राणे यांनी आंदोलन केले याचे आम्ही स्वागत करतो. मात्र, त्यांना हे आत्ताच का सुचले याआधी का सुचले नाही? आता या राणे पिता-पुत्रांना मच्छिमारांनी यांच्या मागे जावे असा उमाळा आला आहे, असा टोलाही तांडेल यांनी लगावला.

बारीक-सारीक मासळी पकडणाऱ्या पर्सनीन नेट आणि बेकायदेशीररित्या मासेमारी करणाऱ्या मिनी पर्सनीन नेट मच्छिमारांनी पारंपरिक मच्छिमारांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आता बेकायदेशीर मासेमारी बंद झाली नाही तर त्यांना समुद्रात झोडपून काढू, असा इशारा तांडेल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

पर्सनीन नेटवाले मासेमारीसाठी भांडवलदारांना हप्ते पुरवतात. त्यामुळे पर्सनीन आणि मिनी-पर्सनीन नेट वाल्यांचे फावले आहे. त्यांना बड्या अधिकाऱ्यांचा आशिर्वाद असल्याचा आरोपही तांडेल यांनी केला. मच्छिमारांच्या हितासाठी आम्ही पर्सनीन नेटवाल्यांच्या विरोधात संघर्ष करणार असून बेकायदेशीर बोटी बंद झाल्या नाही तर त्यांना समुद्रात झोडपून काढण्याचा निर्णय मच्छिमारांनी घेतला असल्याचे तांडेल यांनी यावेळी सांगितले.

संबंधित लेख