narayan rane new party | Sarkarnama

 दसऱ्याच्या मुहूर्तावर राणेंचा नवा पक्ष ? 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

मुंबई : कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन पक्षाची घोषणा करण्याची शक्‍यता आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीबाबत घोषणा करू असे जाहीर केले होते. राणे हे भाजपत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते मात्र दिल्लीत भेटीतही त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. 

दिल्लीतभेटीत कोणताच निर्णय न झाल्याने ते आता ते नव्या पक्षाची स्थापना करण्याची शक्‍यता असून तशा हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राणे यांच्या विरोधात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा पाहता भाजपला भविष्यातील रोषाला सामोरे जावे लागू नये, यासाठी भाजपच्या पक्ष श्रेष्ठींकडून ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. पंचायत समितीच्या निवडणूकांमध्ये श्री समर्थ पॅनल नावाने राणे निवडणूक लढविणार आहेत. जर त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली तर राणे यांच्यासोबत कोण कोण जाणार याची चर्चाही राजकिय वर्तुळात सुरू आहे. 

संबंधित लेख