Narayan Rane Ministry inclusion on conditions | Sarkarnama

बड्या खात्याचा हटट न धरल्यास राणेंचा लवकरच शपथविधी ? 

मृणालिनी नानिवडेकर  : सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

मुंबई :   माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महसूल खात्याचा किंवा गृह ,नगरविकास अशा बडया खात्यांचा आग्रह न धरल्यास त्यांचा शपथविधी मार्गी लागण्याची शक्‍यता भाजपवर्तुळात व्यक्‍त केली जाते आहे.

मुंबई :   माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महसूल खात्याचा किंवा गृह ,नगरविकास अशा बडया खात्यांचा आग्रह न धरल्यास त्यांचा शपथविधी मार्गी लागण्याची शक्‍यता भाजपवर्तुळात व्यक्‍त केली जाते आहे.

मंगळवारी  रात्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षावर भेट घेवून सुमारे दिड तास त्यांच्याशी चर्चा केली.या वेळी फडणवीस यांनी राणे यांना आघाडीत सामील होण्याचे निमंत्रण दिले.दोन दिवसांनी यासंबंधात अंतिम निर्णय घेवू असे राणे यांनी शिवसेनेला आव्हान देण्याची माध्यमांना सांगितले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणे यांचे एनडीएतले भविष्य काय यावर त्यांचा होकार अवलंबून असेल.राणे यांची क्षमता अत्यंत मोठी असल्याने भाजप त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यास तयार आहे.मात्र नारायण राणे यांना मोठया खात्याची आस आहे.

आपण माजी मुख्यमंत्री आहोत आणि आजही मुख्यमंत्री होवू इच्छितो या राणे यांच्या विश्‍वासामुळे ते तुलनेने कमी महत्वाचे खाते स्वीकारण्यास तयार होतील काय याबददल प्रश्‍न आहे.राणे यांना त्यांचा जिल्हा वगळता अन्य कुठल्याही भौगोलिक परिसरात फारसे कार्यकर्ते नाहीत मात्र ते मराठा समाजातील मते ओढू शकतात हे ज्ञात असल्याने भाजप त्यांना मदत करेल.

राणे यांना महसूल खाते देण्यास भाजप उत्सुक नाही.भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप मोदी सरकारला नको असल्याने तसेच राणे यांच्या मुलांसाठीही त्यांना काही हवे असल्याने आताच मोठया खात्याचा आग्रह धरू नका असे सांगण्यात येईल.मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी रात्री उशीरा झालेल्या भेटीत राणेंशी यासंबंधात चर्चा केली जाणार आहे.
 

संबंधित लेख