Narayan Rane may get PWD | Sarkarnama

राणेंचा उपयोग सेनेला आव्हान देण्यासाठी : सार्वजनिक बांधकाम खाते मिळण्याची शक्‍यता

मृणालिनी नानिवडेकर
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

शिवसेनेला आव्हान देण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा चांगलाच उपयोग होणार हे गृहित धरून त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय जवळपास निश्‍चित झाला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला लवकरच 'एनडीए'त स्थान दिले जाणार आहे. येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात राणे यांच्या पक्षाला स्थान दिले जाईल.

मुंबई : शिवसेनेला आव्हान देण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा चांगलाच उपयोग होणार हे गृहित धरून त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय जवळपास निश्‍चित झाला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला लवकरच 'एनडीए'त स्थान दिले जाणार आहे. येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात राणे यांच्या पक्षाला स्थान दिले जाईल.

राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी त्यांनी राजीनामा दिलेल्या विधानपरिषदेच्या जागेवरच पुन्हा निवडले जाणार आहे. त्यासाठी भाजपचे आमदार त्यांना साथ देतील असे गृहित धरले तरी शिवसेना त्यांना समर्थन देणे तर दूरच मतेही देणार नाही. या स्थितीत आमदारांमधुन निवडून येण्यासाठी राणेंना मतांचा आधार लागेल. परिषदेवर निवडून जाताना पक्षादेश लागू होत नाही. त्यामुळे व्हीप पाळला जाण्याची सक्‍ती नसेल.या स्थितीत शिवसेनेची मते फुटली तर तो राणेंचा फायदा असेल.

काँग्रेसची मतेही या निमित्ताने फुटावीत यासाठीही प्रयत्न केले जातील. मात्र राणे यांना अशी फोडाफोडी जमेल काय ते सांगणे कठिण असल्याचे भाजपमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे. राणे यांच्या आक्रमक स्वभावामुळे ते मंत्रिमंडळात तापदायक ठरतील असे वाटल्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यासाठी हा मार्ग शोधुन राणे यांनी वेगळा पक्ष काढावा असा मार्ग शोधल्याचे बोलले जाते.

राणे यांना सेनेच्या पाठिंब्याशिवाय जिंकणे कठिण असल्याने त्यांचा पराभव हा शिवसेनेने प्रतिष्ठेचा मुददा केल्यास सरकारची प्रतिष्ठा जाईल असे मानले जाते आहे.त्यामुळेच राणे यांचा मंत्रिमंडळ प्रवेश येत्या काही दिवसात निश्‍चित झाला तरी त्यांनी जिंकून येणे कठिण आहे. येता महिना या सर्व घडामोडींचा असेल असे सांगितले जाते.

 

संबंधित लेख