Narayan Rane & Kalidas Kolambkar meeting | Sarkarnama

नारायण राणे आणि कालिदास कोळंबकर यांच्यात खलबते

वैदेही काणेकर
गुरुवार, 14 मार्च 2019

स्वतः कालिदास कोळंबकर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मतदारसंघाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मदत केली आहे, अशी जाहीरपणे सांगितले आहे.

मुंबई :  कॉंग्रेस पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी नारायण राणे यांची गुरुवारी भेट घेतली. या दोघांत सुमारे तासभर चर्चा झाली. मात्र या बैठकीत काय खलबते झाली या विषयी दोघांनीही वाच्यता केलेली नाही.

कालिदास कोळंबकर हे कॉंग्रेसचे आमदार आहेत. ते नारायण राणे यांचे निष्ठावंत समर्थक मानले जातात. नुकतेच त्यांनी आपल्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे छायाचित्र लावल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. कालिदास कोळंबकर यांची पावले भाजपच्या दिशेने आहेत अशी चर्चाही सुरू झाली आहे.

स्वतः कालिदास कोळंबकर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मतदारसंघाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मदत केली आहे, अशी जाहीरपणे सांगितले आहे.

कालिदास कोळंबकर यांना बरोबर घेऊन भविष्यात स्वाभिमानी पक्षातून उमेदवारी द्यायची आणि भाजपचा या उमेदवारीला पाठिंबा मिळवायचा अशा हालचाली सुरू असल्याचे समजते.

संबंधित लेख