Narayan Rane has no place in Congress alliance : Bhai Jagtap | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

कॉंग्रेस आघाडीत नारायण राणेंना जागा नाही : भाई जगताप

सरकारनामा
रविवार, 30 डिसेंबर 2018

.

रत्नागिरी:  आगामी निवडणुकीसाठी आघाडी करताना कॉंग्रेस समविचारी पक्षांचा विचार करत आहे. नारायण राणे भाजपचे खासदार असून ते स्वाभिमानचे प्रमुख आहेत. त्यांना आघाडीत घेण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे आमदार भाई जगताप यांनी सांगितले.

ते कॉंग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले , " राज्यातील लोकसभेच्या 42 जागांचा प्रश्‍न सुटला आहे. उर्वरित सहा जागांवर चर्चा सुरु आहे असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर केले. त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल. त्यानुसार राज्यात कॉंग्रेस समविचारी पक्षांबरोबर आघाडी करणार आहे. "

"यामध्ये स्वाभिमान पक्ष नाही. नारायण राणे हे भाजपचे खासदार असल्यामुळे ते कॉंग्रेसच्या विचाराचे कसे होतील. नितेश राणे हे कॉंग्रेसच्या चिन्हावर आले असले तरीही ते स्वाभिमानच्या मेळाव्यात होते. त्यांच्याबद्‌दल न बोलणेच चांगले. रत्नागिरी, सिंधुदुर्गत कॉंग्रेसचे काम सुरु आहे. येथील बहुतांश जागांवर राष्ट्रवादी लढत आल्यामुळे कॉंग्रेसचे चिन्हे मागे पडले. तरीही आमचा प्रयत्न सुरु आहे. "

नारायण राणे यांनी आजच भाजपने  शिवसेनेशी युती केल्यास आपण बरोबर राहणार नाही असे विधान केले आहे . मात्र असे असले तरी काँग्रेस त्यांना सोबत घेण्यास तयार नाही हे भाई  जगताप यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते . 
 

संबंधित लेख