Narayan Rane Devendra Phadanavis Maratha Kranti Morcha | Sarkarnama

#MarathaKrantiMorcha नारायण राणेंच मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक?

सरकारानामा ब्युरो
मंगळवार, 31 जुलै 2018

मराठा आंदोलनाचा भडका शमण्याचे संकेत नसताना आठ दिवसानंतर आजही तो दिवसेंदिवस अधिकच भडकत आहे. संतप्त मराठा आंदोलकांना रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भरोसा मात्र नारायण राणे व नितेश राणे यांच्यावरच अधिक असल्याचे चित्र आहे.

मुंबई: मराठा आंदोलनाचा भडका शमण्याचे संकेत नसताना आठ दिवसानंतर आजही तो दिवसेंदिवस अधिकच भडकत आहे. संतप्त मराठा आंदोलकांना रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भरोसा मात्र नारायण राणे व नितेश राणे यांच्यावरच अधिक असल्याचे चित्र आहे. भाजपचे बाकी सर्व मंत्री, नेते या आंदोलनात संकटमोचकची भूमिका घेण्यात अपयशी ठरत असल्याने सरकार व आंदोलक यांच्यात समन्वयातून मार्ग काढण्याची तारेवरची कसरत सुरू आहे.

आज पर्यंतच्या आंदोलनात महसुलमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी वारंवार निर्णायक भूमिका बजावली आहे. पण यावेळी मात्र मराठा आंदोलकांच्या संतापाच्या समोर जाण्यास सर्वच पालकमंत्री, भाजपचे स्थानिक खासदार, आमदार व नेते दडपणाखाली असल्याचे चित्र  आहे. सुरूवातीला चंद्रकांत  पाटील यांनी आंदोलना बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने आंदोलक आक्रमक झाल्याचे मानले जाते.

त्यातच मुख्यमंत्र्यांना पंढरपूरच्या पुजेला रोखल्यानंतर आता सांगली महानगरपालिका प्रचारातही जाण्यापासून माघार घ्यावी लागली आहे. अशा स्थितीत सहयोगी पक्षाचे नेते व भाजप पुरस्कृत राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी सरकार व आंदोलक यांच्यात मध्यस्थीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. 

आमदार नितेश राणे यांनी तर मराठा युवकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी पोलिस ठाण्यात जाऊन प्रयत्न सुरू केलेत. यामुळे मराठा आंदोलनात शांतता व्हावी म्हणून सरकारचे पर्यायाने मुख्यमंत्र्याचे संकटमोचक म्हणून नारायण राणे यांच्यावरच सर्वाधिक भरोसा असल्याचे मानले जातेय. 

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख