narayan rane- devendra fadavnis meeting at varsha | Sarkarnama

राणे मुख्यमंत्र्यांच्या घरी, पण त्यांची मध्यस्थी समाज स्वीकारणार कां? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

पुणे: माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे मराठा आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. मात्र संतप्त झालेला मराठा समाज ही मध्यस्थी स्वीकारणार का, हा प्रश्‍न आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून नेता विरहीत आंदोलन उभे करण्यात आले. या आंदोलनात राज्यात एक नेता नाही. मात्र मुंबई मोर्चात खासदार संभाजीराजे आणि आमदार नीतेश राणे यांनी सभेच्या मंचकावर जावून आपले नेतृत्व ठसविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर जोरदार टीका केली होती. नारायण राणेही त्यावेळी केंद्रस्थानी होती. मुख्यमंत्री फडणवीस व राणेंशी चर्चा झाल्यानंतर मराठा समाजाला आश्‍वासने देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात मराठा समाजाचे समाधान होवू शकलेले नाही. 

मुंबई मोर्चानंतर राणे भाजपच्यावतीने राज्यसभा खासदार झाले आहेत. आता सुरु झालेल्या आंदोलनात मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील रडारवर आहेत. समाज कोणत्याही परिस्थिती ऐकण्याच्या स्थितीत नाही. विरोधी पक्ष फडणवीसांवर टीका करत आहेत. स्वत: नीलेश राणे यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे मात्र फडणवीसांच्या मदतीला गेल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात ते माध्यमांना काय सांगतात आणि त्यांची ही मध्यस्थी मराठा समाज स्वीकारणार कां, हा प्रश्‍न आहे. 

संबंधित लेख