narayan rane chandrakant khaire aurangabad | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

राणेंना प्रवेश न दिल्याबद्दल भाजपचे अभिनंदन : चंद्रकांत खैरे 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आर्शिवादामुळे मुख्यमंत्रीपदापासून विविध पद उपभोगायला मिळाली. त्या राणेंना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात टीका करण्याचा अधिकार नाही असा टोला शिवसेनेने उपनेते व खासदार चंद्रकांत खैरे यांनी राणे यांना लगावला. तसेच राणेंना पक्षात प्रवेश न दिल्यामुळे भाजप अभिनंदनास पात्र असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत. 

औरंगाबाद ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आर्शिवादामुळे मुख्यमंत्रीपदापासून विविध पद उपभोगायला मिळाली. त्या राणेंना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात टीका करण्याचा अधिकार नाही असा टोला शिवसेनेने उपनेते व खासदार चंद्रकांत खैरे यांनी राणे यांना लगावला. तसेच राणेंना पक्षात प्रवेश न दिल्यामुळे भाजप अभिनंदनास पात्र असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत. 

वाढती महागाई आणि जीएसटीमुळे व्यापारी, सर्वसमान्य नागरीक अडचणीत आहे. त्याच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उद्या (ता. 2) शिवसेना महिला आघाडीच्या वतीने केंद्रातील भाजप सरकार विरोधात क्रांतीचौकात निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनाच्या पुर्वतयारीसाठी शिवसेनेच्या पूर्व, पश्‍चिम, मध्य मतदार संघातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक सुभेदारी विश्रामगृहात खैरे यांच्या नेतृत्वाखाली बोलावण्यात आली होती. कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या राणे यांनी महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाची घोषणा केल्याच्या पार्श्‍वभूमीवर खैरे यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी राणेंचा समाचार घेतला. 

शिवसेनेने त्यांना अनेक पदे दिली तरीही त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली. कॉंग्रेसमध्ये गेल्यावरही त्यांनी वरिष्ठांच्या विरोधात तक्रारी करणे सुरुच ठेवले म्हणून त्यांना बोहरचा रस्ता धरावा लागला असा चिमटाही खैरे यांनी यावेळी काढला. 

कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश मिळावा म्हणून सर्व प्रकारचे प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. पैशाच्या जोरावर सगळ काही मिळवता येत या भ्रमात राणेंनी राहू नये. शिवसेनेने त्यांचा दोनदा पराभव केला याची आठवण राणेंनी ठेवावी असे सांगतानाच राणेंना पक्षात प्रवेश न दिल्यामुळे भाजप अभिनंदनास पात्र असल्याचे देखील खैरे म्हणाले. 

संबंधित लेख