Narayan Rane to begin operation damage Congress from Nagpur ? | Sarkarnama

नारायण राणे यांच्या ऑपरेशन ' डॅमेज काँग्रेसची' सुरवात नागपुरातून ? 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

नागपूर :  कॉंग्रेसमधून राजीनामा देऊन बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे नागपुरात येणार असल्याचे वृत्त आहे. कॉंग्रेसमधील प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे विरोधक मानले जाणारे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत व अनीस अहमद यांची भेट घेण्याची शक्‍यता आहे.

नारायण राणे नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्याची शक्‍यता आहे.

नारायण राणे यांनी आज कॉंग्रेस व विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. आता त्यांच्या पुढील घोषणेकडे साऱ्यांचे लक्ष लागले असताना कोकणातून थेट नागपूर गाठणार असल्याच्या वृत्ताने राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्‍यता आहे. 

शुक्रवारला नागपुरात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत. त्यांचे सकाळपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध कार्यक्रम असल्याने मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी तोपर्यंत व्यस्त राहणार आहेत. ते दोन्ही नेते राणेंना रात्रीच भेटू शकणार आहेत. या भेटीतून भाजप प्रवेशाची निश्‍चितपणे उकल होणार आहे.

राणे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे. या दौऱ्याची सुरूवात नागपूरपासून सुरू होणार आहे. नागपुरात फारसे त्यांचे कार्यकर्ते नसले तरी कॉंग्रेसमधील असंतुष्टांना भेटून कॉंग्रेसवर दबाव आणण्याची खेळी ते खेळणार असल्याचे समजते.

 कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना हटविण्यासाठी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनीस अहमद यांनी दिल्लीला गेले आहेत. हे तिन्ही नेते आज रात्री नागपुरात परत येत आहेत. राणे या तिन्ही नेत्यांची भेट घेण्याची शक्‍यता आहे. 
राणे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. नागपुरातील या तीन नेत्यांनीही चव्हाण यांच्या विरोधात मोहिम उघडली आहे. राणे यांच्या भेटीमुळे या मोहिमेला बळ येण्याची शक्‍यता आहे. नागपुरातील राणे यांचे समर्थक मानले जाणारे नागपूर युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष अजय हिवरकर यांनी मात्र अद्याप राणे यांचा नागपूर दौरा निश्‍चित नसल्याचे सांगितले.

संबंधित लेख