narayan rane attck shivsena | Sarkarnama

पैशासाठी सत्ता हे शिवसेनेचे गणित; नारायण राणेंचा टोला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

रत्नागिरी : सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता हेच गणित शिवसेनेसह अन्य पक्षांचे आहे, असा आरोप करीत खासदार नारायण राणे यांनी "स्वाभिमान' हाच पर्याय जनतेसमोर असल्याचे नमूद केले. 

रत्नागिरी : सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता हेच गणित शिवसेनेसह अन्य पक्षांचे आहे, असा आरोप करीत खासदार नारायण राणे यांनी "स्वाभिमान' हाच पर्याय जनतेसमोर असल्याचे नमूद केले. 

ते म्हणाले, "" शिवसेनेने फक्‍त राजकारण करून जनतेची फसवणूक केली. निवडून आल्यावर वीस वर्षांत काय बदल झाले? ते काहीच करू शकले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला पुरस्कार आणि इकडे दिवाळखोरी, अशी स्थिती आहे. रत्नागिरी दरडोई उत्पन्नात 22 व्या क्रमांकावर आहे. मच्छीमारांचे कधी दर उतरतात, तर कधी भरपाई मिळत नाही. आंब्याचीही तीच स्थिती आहे. आंबा- काजू बोर्डाला शंभर कोटी मंजूर केले; मात्र सत्ताधाऱ्यांनी निधी दिलाच नाही. येथील मंत्री, खासदार, आमदार काय करतात? राजीनामा खिशात घेऊन फिरणारे वाघ या प्रश्‍नांवर राजीनामे बाहेर काढत नाहीत.'' 

संबंधित लेख