narayan rane attack udhav thakray | Sarkarnama

उद्धव ठाकरेंचे अज्ञान आहे हो ! नारायण राणेंची बोचरी टीका 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

मुंबई : मराठा समाजात एकजूट नाही. जे चाललंय ते महाराष्ट्राला पोषक नाही असे स्पष्ट करतानाच मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी म्हणजे अज्ञान आहे अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज केली. 

मुंबई : मराठा समाजात एकजूट नाही. जे चाललंय ते महाराष्ट्राला पोषक नाही असे स्पष्ट करतानाच मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी म्हणजे अज्ञान आहे अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज केली. 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राणेंना प्रश्‍न करण्यात आला की मागास आयोगाची प्रतीक्षा करता मराठा समाजाला आरक्षण सरकारने दिले अशी त्यांची मागणी आहे. या प्रश्‍नाला उत्तर देताना राणे म्हणाले,"" अज्ञान आहे हो ! मागास आयोगाची स्थापना 2006 मध्ये झाली आहे. या आयोगाचा अहवाल आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही हे त्यांना कोण सांगणार. या आयोगाचा अहवाल येण्यासाठी आणखी महिना लागेल हा अहवाल आल्यानंतर मराठ्यांना आरक्षण देता येऊ शकते. मात्र मराठा समाजाला भडकविण्याचे काम केले जात आहे. समाजात फूट पाडण्याचे काम केले जात आहे. 

आत्महत्या करणे योग्य नाही. ज्या आंदोलन चालू आहे. मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही ही आडमुठेपणाची भूमिका घेणे योग्य नाही. मागासवर्गीय आयोगाला डावलून निर्णय घेता येत असेल तर त्यांनी पुढे येऊन सांगावे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला मराठा समाजाने यायला हवे होते. मी वैयक्तिक गेलो तेथे कोणाला घेऊन गेलो नव्हतो. ज्यांना बोलावले ते आले. मी प्रतिष्ठेतेसाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो नव्हतो असेही राणे म्हणाले. 

दरम्यान, परिस्थिती बदलली आहे आरक्षण मिळू शकते आशाही यावेळी राणे यांनी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख