narayan rane attack shivsena | Sarkarnama

शिवसेनेच्या कोलांटउड्या, राणेंची टीका 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

मुंबई : शिवसेना कोलांडउड्या मारण्यात पटाईत आहे. हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मनसे हा विरोधी पक्ष आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी बंदला पाठिंबा देणे समजण्यासारखे आहे. मात्र सत्तेत राहायचे आणि सरकारवर टीका करायची, होर्डींग लावायचे हे योग्य आहे का ? असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. 

इंधन दरवाढीविरोधात आज कॉंग्रेससह विरोधकांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर राणे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, शिवसेना ही दुतोंडी आहे. इंधन दरवाढीचा एकीकडे निषेध करायचा आणि सत्तेतही राहायचे. टीका करायची आणि बंदमध्ये सहभागी व्हायचे नाही हे कसे चालेल. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत बंदचे आयोजित करण्यात आला आहे. राहुल हे पहिल्यांदा रस्त्यावर उतरले आहेत. हे चांगले आहे. विरोधकांनी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र शिवसेना कोलांटउड्या मारत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

संबंधित लेख