narayan rane and marataha samaj | Sarkarnama

नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन

हरी तुगावकर
मंगळवार, 31 जुलै 2018

लातूर : लातूर येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीवर टीका करणाऱ्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी येथे दहन करून त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यातील समन्वयकांची दोन दिवसापूर्वी येथे राज्यस्तरीय बैठक झाली होती. यात ता. 9 ऑगस्ट रोजी राज्यात जनआंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करायची नाही असा निर्णयही घेण्यात आला होता. यावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी टीका केली होती. 

लातूरच्या बैठकीतील लोकांना कोणी अधिकार दिला, कायदा शिकायचा असेल तर माझ्याकडे या असे ते म्हणाले होते. या बद्दल मराठा समाजात असंतोष पसरला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा क्रांती भवनाच्या समोर नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या. 

संबंधित लेख