narayan rane amit shah meeting new delhi | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

नारायण राणे उद्या अमित शहांना भेटणार ? 

सरकारनाम ब्युरो 
रविवार, 24 सप्टेंबर 2017

पुणे : माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसला रामराम केलेले नेते नारायण राणे उद्या (सोमवारी) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेणार असल्याची चर्चा आहे. 

राणे यांनी कॉंग्रेस सोडल्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून ते भाजपत जाणार असल्याचे वृत्त असले तरी स्वत: राणे यांनी या प्रवेशाबाबत कधीही खुलासा केलेला नाही. राणे आज कोणत्याही पक्षात नसले तरी त्यांची काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही भेट घेतली होती. 

महागाईच्या मुद्यावर राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना आक्रमक झाले आहेत. काल शिवसेनेने तर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात शिवराळ घोषणा दिल्याने भाजपमध्येही अस्वस्थता आहे. जर राणे यांनी भाजपत प्रवेश केला तर राज्यात राजकीय घडामोडी गतीमान होतील. राणे यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाला असून ते कधी प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राणेंनी कॉंग्रेसचा राजीनामा दिला असला तरी त्यांचे पूत्र नितेश हे कॉंग्रेसचे आमदार आहेत. ते आज तरी कॉंग्रेसमध्येच आहेत. उद्या राणे दिल्लीत अमित शाह यांची भेट घेणार असल्याने कोणता निर्णय होतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. 

संबंधित लेख