narayan rane about ncp | Sarkarnama

राष्ट्रवादी प्रवेशाबाबत कशा काय वावड्या उठल्या ?: नारायण राणे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मराठा समाजाला जाहीर झालेल्या आरक्षणात आपल्या अहवालाचा विचार झाला याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही त्यांनी सांगितले.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : ''मी राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला भेटलो नाही. कोणाशी चर्चा केली नाही, असे असताना माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत कशा काय वावड्या उठल्या याचं मलाच आश्चर्य वाटतं. राष्ट्रवादीशी माझा कोणताही संबंध नाही,'' अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी आज येथे दिली.

राणे आज येथे विश्वास यात्रेच्या निमित्ताने आले होते. राणे म्हणाले, माझा राष्ट्रवादीशी काही संबंध नाही. माझ्याशी कोणी बोलले नाही त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा होणे चुकीचे आहे परंतु त्यांची बैठक झाली त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर राणे देतील तो उमेदवार घेण्यात यावा, अशी चर्चा झाली. त्याबाबत मला काही माहिती नाही परंतु थेट बातम्या प्रसिद्ध होणे चुकीचे आहे.

मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले, मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा आभारी आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक गरीब वंचित मराठ्यांना फायदा होणार आहे. त्यांचा हा ऐतिहासिक निर्णय आहे समाजाला प्रगतीकडेसाठी आणि शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये फायदा होणार आहे.  

संबंधित लेख