narayan patil reply alligation of satish surywanshi | Sarkarnama

सूर्यवंशीवर मी उपकार केले, पण ते विसरले : नारायण पाटील 

संपत मोरे 
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

माझ्या विरोधकांनी त्याला माझ्याविरोधात उठवून बसवले आहे.

पुणे : आमदार नारायण पाटील यांनी गाडीचे भाडे दिले नसल्याचा आरोप केलेल्या सतीश सूर्यवंशींना नारायण पाटील यांनी जोरदार प्रत्तुत्तर दिले आहे.

"आमदार नारायण पाटील यांना भाड्याने गाडी दिली पण त्यांनी आजवर एक रुपयाही भाडे दिलेले नाही. त्यांच्यामुळे माझ्यावर कर्जाचा बोझा वाढलाया आहे. माझी बायको मानसिक धक्क्याने आजारी पडली आहे. मी माझी कैफियत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडणार आहे." असे नारायण पाटील यांचे एकेकाळचे मित्र सतीश सूर्यवंशी यांनी सकाळी पत्रकार परिषदेत सांगितले.

याबाबत आमदार नारायण पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले," सतीश सूर्यवंशी माझा एकेकाळचा कार्यकर्ता आहे. तो माझ्याकडून फुटून गेला आणि माझ्या विरोधकांनी त्याला माझ्याविरोधात उठवून बसवले आहे.त्याने केलेले आरोप खोटे आहेत. ती गाडी माझ्या मित्रांनी मला भेट दिली आहे,सुर्यवंशीचा काहीही संबंध नाही. सूर्यवंशीवर मी केलेले उपकार ते विसरले आहेत." 

संबंधित लेख