Naran Rane not yet given green signal by BJP? | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

राणेंच्या भाजप प्रवेशाला अद्याप हिरवा झेंडा नाहीच ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई :  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेसला निरोप देत भाजपत प्रवेश करण्याची तयारी कित्येक दिवसांपासून दाखवली असली, तरी अद्याप भारतीय जनता पक्षाने त्यांच्याबद्दल कोणताही निर्णय घेतला नसल्याचे विश्‍वसनीयरीत्या समजते. 

राणे यांचा पक्षाला कितपत उपयोग होईल, त्यांच्या दोन्ही मुलांना पक्षात सामावून घेणे शक्‍य होईल काय, याबद्दल भाजपच्या केंद्रीय नेतृत्व कोणत्याही सकारात्मक निष्कर्षावर पोचलेले नाही. त्यामुळेच नारायण राणे यांनी स्वतंत्र पक्ष काढण्याची तयारी दाखवल्याचे समजते. शिवसेनेची राजी-नाराजी आणि राणेंचा प्रवेश हे दोन वेगळे मुद्दे आहेत, असेही भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने नमूद केले. 

संबंधित लेख