nangare patil`s team raids at baramati | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

आयजी नांगरे पाटलांच्या टिमचे बारामतीत छापे

मिलिंद संगई
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

बारामती शहर : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या पथकाने बारामती शहर, बारामती तालुका व वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत मटका व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले. 

बारामती शहर : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या पथकाने बारामती शहर, बारामती तालुका व वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत मटका व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले. 

थेट महानिरिक्षकांच्या पथकाने या तिन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत कारवाई केल्याने परिसरात आज तो चर्चेचा विषय होता. या तिन्ही पोलिस ठाण्यात यासंदर्भात विविध गुन्हे दाखल झाले आहेत. बारामतीत अनेक ठिकाणी किरकोळ स्वरूपात तर काही ठिकाणी मोठ्या स्वरूपात अवैध व्यवसाय चालतात. सगळ्या बारामतीकरांनाही ते दिसतात. मात्र पोलिस तक्रार येईपर्यंत कारवाईच करायची नाही अशी भूमिका घेतात. अनेकदा या व्यवसायाच्या वर्चस्वावरुन मारामाऱ्या घडल्या आहेत. मध्यंतरी शहरात खूनही झाला. या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई अपेक्षित असूनही ती झाली नव्हती.

नांगरे पाटील यांनी परीक्षेत्रातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी असे अवैध धंदे सुरू असल्याचे दिसल्यास संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचा आदेश वेळोवेळी दिला आहे. पोलिस अधीक्षकांनीही यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. तरीही हे धंदे बंद होत नसल्याचे दिसून येत आहे. अशी पथके खरेच यासाठी कार्यक्षम ठरतात की पोलिसांमधील वेगळ्याच स्पर्धेसाठी ही पथके कार्यरत असतात, असाही संशय यामुळे निर्माण होत असल्याची चर्चा आहे.

 

संबंधित लेख