nandkumar mahajan criticise ujwalla patil | Sarkarnama

ZP अध्यक्षा उज्ज्वला पाटलांचा जळगावपेक्षा मुंबईतच अधिक वेळ; हा कारभार बंद करावा! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

महाजन यांनी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या शाब्दिक हल्ला चढवीत त्या जळगावपेक्षा मुंबईलाच अधिक राहत असल्यामुळे कोणतेही नियोजन होत नाही. मुंबईतून राहून त्या जळगाव जिल्हा परिषदेचा कारभार पाहत असतील तर नियोजन नक्की बिघडणारच आहे. त्यामुळे त्यांनी अगोदर मुंबईतून जिल्हा परिषदेचा कारभार पाहणे बंद करावे असा टोलाही लगावला आहे. 

जळगाव : जिल्हा परिषदेत चार पंचवार्षिक सत्तेत असलेल्या भाजपमध्ये दुही निर्माण झाली असून, पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर जाहीरपणे आरोप केले आहेत. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला करीत, अध्यक्षा पाटील या जळगावपेक्षा मुंबईतच अधिक वेळ असतात. त्यांनी तेथून जिल्हा परिषदेच्या कारभार करणे बंद करावे, असा थेट आरोप केला आहे. 

या घडामोडींमुळे जिल्हा परिषदेतील खडसे व महाजन समर्थक, असे दोन गट समोरासमोर आले असून, हे डॅमेज कंट्रोलींग, कसे होईल, हा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. 

जिल्हा परिषदेच्या आर्थिक विषयाच्या मंजुरीसाठी विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. मात्र ती सभा ऐनवेळी पुढे ढकलण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यावर आली. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांमध्ये नियोजन नसल्याचे दिसून येत असून त्यांच्यातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महाजन यांनी सभा रद्द होण्याचे खापर थेट अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्यावर फोडले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की जिल्हा परिषदेचा निधी वेळेत खर्च व्हावा यासाठी गटनेते पोपट भोळे, सदस्य मधुकर काटे यांच्यासह गटनेत्यांनी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी अध्यक्षांना फोन केला, त्यांनी सभा घेण्यासाठी 23 तारीख ठरविली. तसेच सभेचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी अकलाडे यांच्याशी बोलणे करून दिले व सभा ठरली मात्र नंतर अध्यक्षांनी ऐनवेळी सभा पुढे ढकलली. त्यांनी हा निर्णय का घेतला? याची आम्हाला माहिती नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख