Nanded news - Udhav Thakare public meeting in Nanded | Sarkarnama

भाजपमुळे दिवाळं निघण्याची वेळ : उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

"अच्छे दिन येणार' म्हणून आम्हीही भाजपसोबत होतो; पण आमच्यासह सर्वांचीच घोर निराशा झाली आहे. भाजप आणि मोदी भारतात दिवाळी साजरी होतेय, असे म्हणत असले तरी त्यांच्यामुळे शेतकऱ्यांपासून सर्वांचेच दिवाळं निघण्याची वेळ आली आहे, असा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.  

नांदेड : "अच्छे दिन येणार' म्हणून आम्हीही भाजपसोबत होतो; पण आमच्यासह सर्वांचीच घोर निराशा झाली आहे. भाजप आणि मोदी भारतात दिवाळी साजरी होतेय, असे म्हणत असले तरी त्यांच्यामुळे शेतकऱ्यांपासून सर्वांचेच दिवाळं निघण्याची वेळ आली आहे, असा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.  नांदेड महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, ""भाजपने आता जगातला सर्वांत मोठा पक्ष असल्याचे सांगण्यास सुरवात केली आहे. त्यांना जगभरातूनच नव्हे, तर आता चंद्र आणि मंगळावरूनसुद्धा मिस्ड कॉल येत आहेत; तर दुसरीकडे भाजपला अजूनही उमेदवार मिळत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या पक्षातील लोकांना ओढण्याचे काम सुरू आहे.'' 

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नसल्याचे ठाकरे म्हणाले. "फक्त गोड बोलून सरकार वेळ मारून नेत आहे. आदर्श प्रकरणात नांदेड आणि महाराष्ट्राचीही अब्रू गेली. अशोक चव्हाण यांना किती दिवस डोक्‍यावर घेता?'' असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित नागरिकांना केला. 

संबंधित लेख