nanded mayor | Sarkarnama

महापौर व नगर सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची नांदेडमध्ये मागणी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 मे 2017

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेला गोंधळ अखेर पोलिस ठाण्यात पोहचला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांविरुद्ध महापौर शैलजा स्वामी यांनी तक्रार दिली आहे. राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी महापौर व नगरसचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना व भाजपने पोलिसांना एक निवेदन देऊन केली आहे. 

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेला गोंधळ अखेर पोलिस ठाण्यात पोहचला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांविरुद्ध महापौर शैलजा स्वामी यांनी तक्रार दिली आहे. राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी महापौर व नगरसचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना व भाजपने पोलिसांना एक निवेदन देऊन केली आहे. 

नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेची शुक्रवारी दुपारी तीन वाजता सर्वसाधारण सभा होती. या सभेत सत्ताधारी कॉंग्रेस व विरोधी पक्षातील नगरसेवकांत बाचाबाची झाली. अखेर शिवसेनेच्या नगरसेवकांनी राजदंड पळविला. दुसरीकडे महापौर शैलजा स्वामी यांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बोलण्यास मनाई केली. यामुळे सभागृहात चांगलाच वाद निर्माण झाला.

सभागृहातील वाद अखेर पोलिस ठाण्यात पोहचला. सभागृहाची मानमर्यादा शिवसेनेच्या व भाजप नगरसेवकांनी ओलांडली. सभागृहाचा वेळ वाया घालवला यावरून काही सदस्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वामी यांनी पोलिस अधीक्षकांना भेटून केली.

दुसरीकडे सभागृहात गोंधळ सुरू असतानाच महापौर व नगरसचिव यांनी राष्ट्रगीताला सुरूवात केली. तसेच सभागृहाच्या भावना लक्षात घेतल्या नाहीत. यामुळे राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या महापौर व नगरसचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वजिराबाद पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली.

यावेळी विरोधी पक्षनेता प्रमोद खेडकर, दीपकसिंग रावत, अशोक उमरेकर, विनय गुर्रम, बाळासाहेब देशमुख, नागाबाई कोकाटे, संगीता रौत्रे, बालाजी कल्याणकर, अभिषेक सौदे यांच्यासह शहरप्रमुख दत्ता कोकाटे, चैतन्यबापू देशमुख, दिलीप कंदकुर्ते, प्रवीण साले, संजय कोडगे यांची उपस्थिती होती. 

नेमके काय झाले याची चौकशी करू 
राष्ट्रगीताबाबत झालेली घटना महापालिकेच्या सभागृहातील आहे. सभागृहातील कामकाजामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करता येत नाही. तसेच आतमध्ये नेमके काय झाले याची चौकशी करणार असून सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे. पोलिसांचे अधिकार वापरून जर या प्रकरणात गुन्हे दाखल होत असतील तर दोन्ही बाजूच्या लोकांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी सांगितले. 

संबंधित लेख