nanded hingoli band | Sarkarnama

नांदेड आणि हिंगोलीत कडकडीत बंद, काही ठिकाणी हिंसक घटना

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

नांदेड : आरक्षणाच्या मागणीसाठी कायगाव टोका येथील गोदावरी नदीवरील पुलाजवळ सोमवारी काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या केली. त्यामुळे मराठा समाजात सरकार विरोधी संतापाची लाट पसरली असून जिल्हाभरात शिंदे यांना श्रद्धाजंली अर्पण करून आंदोलन करण्यात आले आहे. नांदेड शहरातील खासदार अशोक चव्हाण, आमदार डी. पी. सावंत, अमर राजूरकर, हेमंत पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, राम पाटील रातोळीकर आदींच्या घरांना पोलिसांचे संरक्षण, त्यांच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरीकेट लावले. 

नांदेड शहरात कडकडीत बंद, हजार एक जणांच्या जमावाने मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढून घोषणाबाजी केली व जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले. यावेळी जमावाने वाहने व दुकानांवर तसेच भाग्यनगर पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. त्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. सध्या शहरात तणावपूर्व वातावरण आहे. 

पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या गाड्या तरोडेकर चौक राज कॉर्नर येथे फोडल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले. नांदेड शहरातील शाळा, महाविद्यालये कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाने बंदला पाठिंबा दिला असून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना तसे निवेदनही देण्यात आले. काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी वकील संघाच्या वतीने करण्यात आली. 

नांदेड ग्रामीण भागात कंधारमध्ये बंदला हिंसक वळण लागले. आमदार चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या पोलिंसावर दगडफेक. 

उमरी, धर्माबाद परिसरात बंदला प्रतिसाद मिळाला या ठिकाणी मराठा समाजाकडून शांततेत बंद पाळण्यात आला. अर्धापूरमध्ये नागपूर महामार्गावर टायर-लाकडी खोड जाळून रास्ता रोको करण्यात आला. यामुळे महामार्गावरील वाहतूक चार तास ठप्प झाली होती. मुखेड, देगलूर परिसरातील मुक्रमाबाद- जांब गावात सरकारची अंत्ययात्रा काढून केला निषेध करण्यात आला. भोकर, बिलोली या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून दिला बंदमध्ये सहभाग घेतला. 

हिंगोलीत हिंसक घटना 

हिंगोली तालुक्‍यातील खानापूर चित्ता येथे बासंबा पोलिसांची जीप जाळली. वसमतमध्ये खासगी बसची तोडफोड करण्यात आली. येथील जवाहर कॉलनी भागात संतप्त आंदोलकांकडून दगडफेक व वाहनांची जाळपोळ करण्यात आली. बोल्डा फाटा, आखाडा बाळापूर येथे मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. शहरातील शाळा व महाविद्यालये, बॅंका देखील बंद करण्यात आल्या होत्या. कळमनुरीमध्ये तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. 
 
संबंधित लेख