nanded gurudwara mandal | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

गुरुद्वारा बोर्ड निवडणुकीत बुंगई, कुंजीवाले आणि महाजन विजयी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 31 डिसेंबर 2018

नांदेड : गुरुव्दारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्यांच्या निवडणुकीत रवींद्र सिंग बुंगई (मते 4478) मनप्रितसिंग कुंजीवाले (4246) आणि गुरमितसिंग लड्डूसिंग महाजन (3374) हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. मंडळाच्या सदस्यपदासाठी शुक्रवारी मतदान झाले. शनिवारी त्या त्या तालुक्‍याच्या ठिकाणी मतमोजणी झाली. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निकाल जाहीर केला. 

तीन सदस्यासाठी संपूर्ण मराठवाड्यात 68 आणि चंद्रपूर जिल्ह्यातील तीन अशा 71 मतदान केंद्रावर मतदान झाले होते. या निवडणुकीत 12 हजार 714 मतदार होते. या तीन जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी सर्वात जास्त 22 उमेदवार नांदेड शहरातील तर चार उमेदवार हे औरंगाबाद येथील होते. मराठवाड्यात आणि चंद्रपूर जिल्ह्यात तीन अशी 71 मतदान केंद्र होती. मतमोजणी शनिवारी झाली आणि सोमवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे निकाल जाहीर करण्यात आला. निवडणुक प्राधिकृत अधिकारी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी. मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे. तहसीलदार अरविंद नरसीकर आदी उपस्थित होते. यावेळी तिन्ही विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. 

संबंधित लेख