nanded congress | Sarkarnama

सरकारविरोधी लढ्यासाठी गावांना कॉंग्रेसची हाक

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

नांदेड : शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी सरकार विरोधात सुरू असलेल्या लढ्यात झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी ग्रामस्थांनी सहभागी होण्याची हाक कॉंग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली होती. संपूर्ण कर्जमाफी तसेच शेती मालास हमी भाव मिळावा, असा ठराव अनेक गावांतील ग्रामसभेत मांडण्यात आला असून सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नांदेड : शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी सरकार विरोधात सुरू असलेल्या लढ्यात झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी ग्रामस्थांनी सहभागी होण्याची हाक कॉंग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली होती. संपूर्ण कर्जमाफी तसेच शेती मालास हमी भाव मिळावा, असा ठराव अनेक गावांतील ग्रामसभेत मांडण्यात आला असून सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कॉंग्रेस पक्षाच्या हाकेला नांदेड जिल्ह्यातील अनेक गावातील ग्रामस्थांची साथ मिळाली असून सामूहिक लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. 
राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागणींसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने संघर्ष यात्रा काढून शासनाचे लक्ष वेधले आहे. संघर्ष यात्रेत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आदी सहभाग घेऊन नेतृत्व केले आहे.

मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सात बारा कोरा करण्यात यावा; तसेच शेती मालास हमी भाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी राज्य सरकारला धारेवर धरले असून आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 
जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसभा ठराव पाठविण्याची हाक देण्यात आली आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांनी महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी तसेच शेतमालास हमी भाव देण्यात यावा, या संदर्भात ग्रामसभेत ठराव संमत करून शासनाकडे पाठविण्याचे आवाहन केले होते.

कॉंग्रेसच्या हाकेला गावकऱ्यांची साथ मिळाली असून जिल्ह्यातील अनेक गावांतील ग्रामसभेत ठराव सर्वानुमते पास करण्यात आला असून शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीचा लढा यशस्वी करण्यासाठी तालुक्‍यातील कॉंग्रेसच्या लोकप्रतिनिधी व आजी - माजी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलाय. 

संबंधित लेख