nanded airport | Sarkarnama

नांदेडला विमानसेवेच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात घोषणाबाजी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 एप्रिल 2017

नांदेड : नांदेड - हैद्रराबाद विमान सेवेच्या उद्‌घाटन समारंभात कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्रेयवादाचे नाट्य रंगविले...दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला...

नांदेड : नांदेड - हैद्रराबाद विमान सेवेच्या उद्‌घाटन समारंभात कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्रेयवादाचे नाट्य रंगविले...दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला... दोघांनीही आपल्या पक्षाच्या आणि नेत्यांच्या घोषणा देण्यास सुरवात केली...कार्यक्रमात अचानक उडालेल्या गोंधळामुळे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि विमान व्यवस्थापनाचे पदाधिकारी अचंबित झाले....परिस्थिती नियंत्रणात कशी आणता येईल याचा प्रयत्न करू लागले....पंकजा मुंडे यांनी अखेर शांत राहण्याचे आवाहन केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली....विशेष म्हणजे नांदेड विमान सेवा उद्‌घाटन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिमला येथील विमानसेवेच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम व्हिडिओलिंकद्वारे एकाच वेळेस आयोजित करण्यात आला होता... 

उडान योजनेतंर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरूवारी सकाळी दहा वाजता नांदेड - हैदराबाद या विमानसेवेचे उद्‌घाटन व्हिडिओ लिंकद्वारे सिमला येथून करण्यात आले. यावेळी नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंगजी विमानतळावर आयोजित कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, कॉंग्रेसचे आमदार डी. पी सावंत, अमर राजूरकर, भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड, महापौर शैलजा स्वामी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर, विमानतळ विभागाचे किशनलाल शर्मा व्यासपीठावर उपस्थित होते. 
यावेळी सुरवातीला आमदार सावंत, खासदार अशोक चव्हाण, कामगारमंत्री निलंगेकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भाषणे झाली. कॉंग्रेस आणि भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रेय लाटण्यावरून घोषणाबाजी केली. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात नांदेडकर टाळ्या वाजविण्याच्या बाबतीत ट्रेण्ड आहेत. ठराविक वेळीच टाळ्या वाजत आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी उडाणच्या माध्यमातून सर्वसामान्यांना विमान प्रवास घडवून आणण्याचा प्रयत्न केला त्याचे स्वागत टाळ्या वाजून झाले पाहिजे. असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून पंकजांच्या आवाहनाला साद देण्याचा प्रयत्न केला मात्र, हेच नेमके कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना रुचले नाही....अशोक चव्हाण जिंदाबाद, कॉंग्रेस पक्षाचा विजय असो अशा पद्धतीच्या घोषणा देण्यास सुरवात केली. त्यानंतर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील मोदी... मोदी..मोदी...अशा घोषणा सुरू केल्या. 

हा कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला...मात्र, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यामुळे भाजपला श्रेय मिळतेय म्हणून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसच्या विजयाच्या घोषणा दिल्या....यावर कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी अशा कार्यक्रमात गोंधळ करणे योग्य नसून, असे गोंधळ होणे म्हणजे पक्ष नेतृत्वच जबाबदार आहे अशी निलंगेकरांनी टीका केली. आमदार राजूरकर यांनी कार्यकर्त्यांना शांत केले.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी माईकवरून आवाहन केले आम्ही सगळे नेते एकत्र आनंदाने बसलो आहोत. हे आंदोलनाचे व्यासपीठ नाही. मराठवाड्याच्या चांगल्या संस्कृतीचे प्रदर्शन करा. मराठवाड्यासाठी विमानसेवा सुरू होते आहे ही चांगली बाब असून त्याचे स्वागत केले पाहिजे, असे आवाहन करत कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. 

संबंधित लेख