शेतकऱ्यांसाठी प्रसंगी खासदारकीचाही राजीनामा देईन : खासदार नाना पटोले

यवतमाळ जिल्ह्यातील टिटवी गावात जाऊन महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याचे जाहीर करणाऱ्या भाजपचे खासदार नाना पटोले यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे नानांचा फुसका बार ठरला. शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी आपण राज्यभर दौरे करणार असल्याचे त्यांनी यावेळी झालेल्या गावकऱ्यांच्या बैठकीत जाहीर केले.
 शेतकऱ्यांसाठी प्रसंगी खासदारकीचाही राजीनामा देईन : खासदार नाना पटोले

यवतमाळ : यापूर्वी मी शेतकऱ्यांसाठी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तशीच वेळ आली तर खासदारकीही सोडून देईन असा इशारा खासदार नाना पटोले यांनी आज दिला. काही दिवसांपूर्वी टिटवी येथील प्रकाश मानगावकर या शेतकऱ्याने आत्महत्या केली. यावेळी या शेतकऱ्याने सागाच्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आत्महत्येला जबाबदार धरले होते. सागाच्या पानावर लिहिलेला हा मजकूर प्रकाशित झाला होता. . या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला जाऊन नाना पटोले यांनी भेट दिली. यावेळी खासदार पटोले काय घोषणा करणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु पटोले यांनी कोणतीही महत्त्वपूर्ण घोषणा केली नाही एवढेच नव्हे तर केंद्र व राज्य सरकारवर नेहमीप्रमाणे टीकाही केली नाही. त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. 

यवतमाळ जिल्ह्यातील टिटवी गावात जाऊन खासदार नाना पटोले यांनी मानगावकर कुटुंबाची भएट घेऊन 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. तसेच सरकारच्या पातळीवर शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी तसेच जागृती करण्यासाठी मी राज्यभर दौरे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

यवतमाळ जिल्ह्यातील टिटवी गावात जाऊन महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याचे जाहीर करणाऱ्या भाजपचे खासदार नाना पटोले यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे नानांचा फुसका बार ठरला. शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी आपण राज्यभर दौरे करणार असल्याचे त्यांनी यावेळी झालेल्या गावकऱ्यांच्या बैठकीत जाहीर केले. या दौऱ्यात मात्र भाजपचा एकही कार्यकर्ता फिरकला नाही. 

गेल्या काही दिवसांपासून खासदार पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा व महागाईला त्यांनी दोन्ही सरकारांना जबाबदार धरले असून या दोन्ही सरकारांवर ताशेरे ओढण्याची संधी दवडली नाही. केंद्र व राज्य सरकारशी दोन हात करण्याची भाषा त्यांच्याकडून केली जात होती. या पार्श्‍वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील टिटवी (ता. घाटंजी) येथे जाऊन महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याचे जाहीर केल्याने सर्व प्रसार माध्यमांचे लक्ष या टिटवी भेटीकडे लागले होते. 

भाजपचे कार्यकर्ते दूर 
खासदार पटोले यांच्या दौऱ्यात भाजपचे कार्यकर्ते नव्हते. भाजपचा खासदार या भागात येऊनही भाजपचा एकही कार्यकर्ता पटोलेंच्या दौऱ्यात सहभागी झाला नव्हता 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com