nana patekar on tanushree datta | Sarkarnama

जो झूठ है वो झूठ ही है : नाना पाटेकर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

`जो झूठ है वो झूठ ही है' असे सांगत अभिनेते नाना पाटेकर यांनी अभिनेत्री तनुश्री दत्ता यांचे आरोप आज फेटाळून लावले. 

पुणे : `जो झूठ है वो झूठ ही है' असे सांगत अभिनेते नाना पाटेकर यांनी अभिनेत्री तनुश्री दत्ता यांचे आरोप आज फेटाळून लावले. 

तनुश्री दत्ता यांनी `हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रिकरणावेळी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. ही घटना दहा वर्षांपूर्वीची आहे. नानांवर आरोप करताना दत्ता यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. तनुश्री दत्ता यांनी नानांवर आरोप करण्यामागे हेतू वेगळाच असल्याचा संशय विरोधक व्यक्त करीत आहेत. 

नाना पाटेकर आज जैसलमेरहून `हाऊसफूल-4' चित्रपटाचे शुटिंग आटोपून मुंबईला परतले. त्यावेळी विमानतळावर त्यांना पत्रकारांनी गाठले. मात्र त्यांनी सध्या तरी सविस्तर बोलण्यास नकार दिला. गाडीत बसताना ते एवढेच म्हणाले, की `मैं पहले भी इस बारे में बात कर चुका हूं। जो झूठ है वो झूठ ही है।' 

 

संबंधित लेख