Nana Blakawade passes away | Sarkarnama

राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब बलकवडे यांचे निधन 

राजेंद्रकृष्ण कापसे
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

खडकवासला : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब बलकवडे यांचे आज (7 ऑगस्ट) अल्पशा आजाराने निधन झाले. 

नानासाहेब बलकवडे हे आजारपणामुळे गेली काही वर्षे सक्रिय राजकारणापासून दूर होते. पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा दरारा निर्माण करणाऱ्या नेत्यांत नानांचा समावेश होता. त्यांनी 1995 मध्ये शिवसेनेकडून मुळशी- हवेली या विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार ज्येष्ठ अशोक मोहोळ यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यानंतर 1996 मध्ये खेड लोकसभा मतदार संघातून निवृत्तीशेठ शेरकर यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. 

राज्यात शिवसेना-भाजपचे युती सरकार असताना ते शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख होते. त्यांनी विशेषतः मुळशी तालुक्‍यात दरारा निर्माण केला होता. पिरंगुट येथील स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याचा विषय फार गाजला होता. शिवसेनेतील काही नेत्यांशी त्यांचे न जमल्याने त्यांनी नंतर राष्ट्रवादीत प्रवेश करून ते प्रदेश उपाध्यक्ष देखील ते होते. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली होती. पीएमटीच्या कामगारांचे नेतृत्त्व त्यांनी केले होते. सिंहगड पायथा येथे मोठे हॉटेल उभारून व्यवसाय देखील केला. त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी पाच वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.                 

संबंधित लेख