namo tea center at pune | Sarkarnama

मोदी यांच्या प्रेमापोटी पुण्यात निघाले "नमो अमृततुल्य'

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

पुणे : चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठ्या अभिमानाने सांगितले जाते. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या अभिमानाने ही गोष्ट सांगत असतात. मात्र पुण्यात आता पंतप्रधान मोदी यांच्या नावाने "नमो अमृततुल्य' हे चहाचे हॉटेल सुरू झाले असून येत्या दोन महिन्यात अशी बारा अमृततुल्य पुण्यात सुरू होणार आहेत. 

पुण्यातील बाजीराव रस्त्यावर अनिकेत कंक व निखील आखाडे या दोन तरूणांनी शुक्रवारी या अमृततुल्यची सुरवात केली. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शुक्रवारी या हॉटेलचे उदघाटन झाले. चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला या अभिमानाच्या भावनेतून पंतप्रधान मोदी यांचे नाव चहाच्या या हॉटेलला दिल्याचे हॉटेलचे चालक अनिकेत कंक यांनी सांगितले. ते म्हणाले, गेल्या पंधरा वर्षापासून मी या व्यवसायात आहे. मोदी यांच्या प्रेमापोटी त्यांचे नाव हॉटेलला दिले आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात पुण्यात आणखी बारा हॉटेल सुरू करणार असल्याचे कंक यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या नावाने सुरू झालेले हे देशातील पहिले अमृततुल्य असल्याचा दावा, कंक यांनी केला. शहरात बारा ठिकाणी योग्य अशा जागा शोधण्याचे काम सुरू असून येत्या दोन-तीन महिन्यात नमो अमृततुल्यच्या शाखा सुरू झालेल्या दिसतील, असे कंक यांनी सांगितले. 

राजकीय मतभेदातून पंतप्रधान मोदी यांच्यावर विविध पातळ्यांवर टीका होत असली तरी त्यांच्या नावाला देशात सध्या सर्वाधिक वलय आहे. वेगवगळ्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांचे नाव देशभर नेहमीच चर्चेच असते. पुण्यात सुरू झालेल्या या हॉटेलमुळे मोदी यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 
 
संबंधित लेख