najubai questions about marathwada university | Sarkarnama

मराठवाडा विद्यापीठ चळवळीची सूत्रे शरद पवार यांच्या हाती का गेली? 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

शरद पाटील यांचे विचार दलित साहित्यिकांनी नाकारले. यामुळे या साहित्याची चळवळ खुंटीत झाली!

मुंबई : प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांचे विचार, त्यांनी मांडलेले साहित्य, कला यांचे वेगळे सौंदर्यशास्त्र हे दलित साहित्यिकांनी नाकारले. यामुळे या साहित्याची चळवळ खुंटीत झाली, असे मत पहिल्या आदिवासी लेखिका कॉ. नजुबाई गावित यांनी व्यक्त केले. 

ग्रंथाली वाचक चळवळ व दया पवार प्रतिष्ठान यांच्याकडून जाहीर झालेला पहिला "बलुतं' पुरस्कार नजुबाई गावित यांना गुरुवारी ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी नजुबाई यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावे यासाठी आम्ही विविध पद्धतीने आंदोलने केली. त्यासाठी अनेक डावपेच आखले. परंतु, त्या चळवळीचे सूत्रे शरद पवार यांच्या हाती का गेली? सगळी चळवळ, सगळ्या संघटना विस्कळित झाल्या, याचा विचार का करण्यात आला नाही? असा सवाल त्यांनी केला. दलित, शोषित समाजाने एका झेंड्याखाली आले पाहिजे असे त्यावेळी दलित साहित्यिकांना वाटत होते. परंतु, शरद पाटील यांचे सौंदर्यशास्त्र नाकारल्याने सर्व दलित साहित्य चळवळ खुंटीत झाली. 

संबंधित लेख