naipaul no more | Sarkarnama

नोबेल विजेते साहित्यिक व्ही. एस. नायपॉल यांचे निधन 

वृत्तसंस्था
रविवार, 12 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : भारतीय वंशाचे ज्येष्ठ साहित्यिक आणि नोबेल पारितोषिक विजेते विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांचे काल (शनिवारी) लंडनमध्ये त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. "अ बेन्ड इन दि रिव्हर' आणि "अ हाऊस फॉर मिस्टर' बिस्वास सारख्या जगात गाजलेल्या कांदबऱ्या त्यांच्या नावावर आहेत.

नवी दिल्ली : भारतीय वंशाचे ज्येष्ठ साहित्यिक आणि नोबेल पारितोषिक विजेते विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांचे काल (शनिवारी) लंडनमध्ये त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. "अ बेन्ड इन दि रिव्हर' आणि "अ हाऊस फॉर मिस्टर' बिस्वास सारख्या जगात गाजलेल्या कांदबऱ्या त्यांच्या नावावर आहेत.

 

नायपॉल यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देश विदेशातील मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे. 

नायपॉल यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना त्यांच्या पत्नी नादिरा म्हणाल्या, त्यांनी उभ्या आयुष्यात जे काही मिळवले ते समृद्ध करणारे आहे. ते ज्यांच्यावर प्रेम करीत होते. त्यांच्यासोबत असतानाच त्यांनी आपला प्राण सोडला.17 ऑगस्ट 1932 रोजी त्रिनिदाद येथे नायपॉल यांचा जन्म झाला. त्रिनिदादपासून लंडनपर्यंतचा प्रवास आणि विविध देशांतील प्रवासाचा प्रभाव त्यांच्या लेखनीत दिसत होता. त्यांना 2001 मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आपल्या संपूर्ण करिअरमध्ये नायपॉल यांनी ज्या रचना केल्या, त्यामुळे त्यांना व्या शतकातील महान लेखकांच्या रांगेत नेऊन ठेवले.

त्यांना नोबेलप्रमाणेच 1971 मध्ये बुकर पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून नायपॉल यांनी साहित्य क्षेत्राला दिलेल्या योगदानाची आठवण करून देतानाच त्यांनी राजकारण, सांस्कृतिक, इतिहास आदी क्षेत्राबाबत केलेले लिखानही दीर्घकाळ स्मरणात राहिल असे म्हटले आहे. 

नायपॉल यांच्या वंशजांना वेस्टइंडिजमध्ये भारतातून जबरदस्तीने मजुरीसाठी आणण्यात आले होते. त्यांचे वडिलही एक कादंबरीकार होते मात्र, त्यांना योग्य संधी मिळू न शकल्याने त्यांना यात करिअर करता आले नाही. मात्र, नायपॉल यांनी आपल्या वडीलांचे स्वप्न पूर्ण केलेच. एक साहित्यिक म्हणून जगभर त्यांनी आपला ठसा उमठविला होता.

संबंधित लेख