naik and state cabinet | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

मंत्रिपदासाठी जगताप स्वतः इच्छूक नाहीत - शिवाजीराव नाईक

संपत मोरे
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

पुणे : " सांगली जिल्ह्याला यावेळी मंत्रिपद मिळेल मात्र कोणाला मिळेल हे मी आज सांगू शकत नाही."असे सांगत शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी'आपण अजूनही आशावादी'असल्याचे सूचित केले. विलासराव जगताप यांचेही नाव नवीन विस्तारात चर्चत आहे त्याबाबत त्यानी प्रतिक्रिया दिली. 

नाईक म्हणाले," विलासराव जगताप स्वतः इच्छूक नाहीत पण त्यांचे कार्यकर्ते आग्रही आहेत.आणि त्यांच्या कार्यकर्त्याना तस वाटणं स्वाभाविक आहे. पण जगताप यांनी माझ्याशी बोलताना ते इच्छुक नाहीत असं सांगितलं आहे. ते माझे सहकारी आहेत, त्यांना मंत्रिपद मिळालं तर मला आनंदच होईल.पण ते स्वतः आग्रही नाहीत. सांगली जिल्ह्याचा यावेळी विचार व्हावा. कोणालाही मिळो पण संधी मिळाली पाहिजे."असेही नाईक यावेळी म्हणाले. 
 
संबंधित लेख