nagpur-vanadongri-samir-meghe-varsha-shahakar | Sarkarnama

वानाडोंगरीत आमदार मेघेंनी गड राखला 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगरपंचायतमध्ये भाजपचे आमदार समीर मेघे यांनी भाजपचा गड राखला. भाजपच्या वर्षा शहाकार विजयी झाल्या असून या नगरपंचायतीच्या 21 प्रभागांपैकी 17 प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले असून या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. 

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगरपंचायतमध्ये भाजपचे आमदार समीर मेघे यांनी भाजपचा गड राखला. भाजपच्या वर्षा शहाकार विजयी झाल्या असून या नगरपंचायतीच्या 21 प्रभागांपैकी 17 प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले असून या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. 

नागपूर शहराला लागून असलेल्या या नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसची आघाडी झाल्यानंतरही या आघाडीची डाळ शिजू शकली नाही. आमदार समीर मेघे यांनी एकहाती विजय मिळवित या मतदारसंघावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. 

या निवडणुकीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री व नागपूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बंग यांच्या वर्चस्वाला जोरदार धक्का बसला आहे. रमेश बंग यांच्या प्रभावाचा हा भाग होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला कॉंग्रेसने पाठिंबा जाहीर केला होता. तरीही या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला प्रभावशाली कामगिरी करता आली नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होत्या. सेनेने चांगली कामगिरी केली असून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहे. 

कामाची पावती मिळाली 
विजयाबद्दल "सरकारनामा'शी बोलताना आमदार समीर मेघे म्हणाले, की निवडणुकीत गैरप्रकार होत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना या निवडणुकीने उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यात व नागपूर जिल्ह्यात होत असलेल्या विकास कामांना या निवडणुकीत जनतेने पावती दिली आहे. वानाडोंगरी हा परिसर अद्यापही अविकसित आहे. या परिसराच्या विकासासाठी पुन्हा प्रयत्न करण्यात येईल. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख