nagpur-surjewala-sharad-pawar | Sarkarnama

`राफेल'बाबत पवारांच्या भूमिकेचे सुरजेवालांकडून समर्थन

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

राफेल विमान खरेदी व्यवहाराबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलेली भूमिका चुकीची नाही. कॉंग्रेससह विरोधकांनी उचललेल्या मुद्यांनाच पवारांच्या वक्तव्याने बळकटी मिळाल्याचा दावा कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केला आहे.

नागपूर : राफेल विमान खरेदी व्यवहाराबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलेली भूमिका चुकीची नाही. कॉंग्रेससह विरोधकांनी उचललेल्या मुद्यांनाच पवारांच्या वक्तव्याने बळकटी मिळाल्याचा दावा कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केला आहे.

राफेलवर शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. यामुळे मोदींच्या हेतूंवर शंका घेण्यासारखे काहीही नाही, या वक्तव्याबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ट्‌विटरद्वारे पवार यांचे अभिनंदनही केले होते. यावर नागपुरातील पत्रकार परिषदेत विचारले असताना सुरजेवाला म्हणाले, पवार यांनी केलेले वक्तव्य तोडून दाखविण्यात आलेले आहेत. राफेलच्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी कॉंग्रेस व विरोधी पक्षांनी जेपीसीची (संयुक्त संसदीय समिती) स्थापन करण्याचीच मागणी पवार यांनी केली आहे. यामुळे शरद पवार यांनी वेगळी भूमिका मांडली किंवा मोदींच्या समर्थनार्थ वक्तव्य दिले, असे म्हणणे योग्य होणार नाही. 

शरद पवार यांनी राफेलच्या वाढीव किंमतीवर शंका उपस्थित केली आहे. यावरून पवारांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या राफेल सौद्याचे समर्थन कसे म्हणता येईल, असा उलट प्रश्‍न सुरजेवाला यांनी पत्रकारांना विचारला. 

संबंधित लेख