आदिवासींच्या हक्कांसाठी लढणे म्हणजे नक्षलवाद नव्हे : केंद्रीय राज्यमंत्री सुदर्शन भगत 

देशातील आदिवासींच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांना नक्षलवादी ठरविणे योग्य नसल्याचे मत केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी नागपुरात व्यक्त केले. यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे.
आदिवासींच्या हक्कांसाठी लढणे म्हणजे नक्षलवाद नव्हे : केंद्रीय राज्यमंत्री सुदर्शन भगत 

नागपूर : देशातील आदिवासींच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांना नक्षलवादी ठरविणे योग्य नसल्याचे मत केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी नागपुरात व्यक्त केले. यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे. 

नागपुरातील `वनामती' येथे आदिवासींच्या हक्कासाठी एक परिसंवाद आयोजित केला होता. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंगही हजर होत्या. 

काही दिवसांपूर्वी विदर्भातील पाच जणांना नक्षलवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोपावरून अटक करण्यात आली आहे. हे पाचही जण आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आहेत. यातील एक वकील, एक प्राध्यापक, एक उच्चशिक्षित युवक आहे. त्यांच्या विरोधात ते थेट नक्षलवादी किंवा माओवादी चळवळीत सहभागी असल्याचे पुरावे अद्यापही पोलिसांच्या हातात आलेले नाहीत. 

या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना सुदर्शन भगत म्हणाले, की आदिवासींच्या हक्‍कांसाठी लढणारे अनेक कार्यकर्ते देशात आहेत. ते सर्वजण नक्षलवादी किंवा माओवादी चळवळीशी संबंधित आहेत, असा समज करून घेणे योग्य नाही. नागपुरात अटक झालेल्या कार्यकर्त्यांबद्दल पोलिस या संदर्भात चौकशी करीत आहे. त्यापूर्वीच काही निष्कर्ष काढणे योग्य नाही. सरकारला आपले काम करू द्यावे, अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.
राजकारणाच्या बित्तंबातम्यांसाठी डाऊनलोड करा sarkarnama अॅप 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com