किर्तीकर, जाधवांवर नागपूर शिवसेना `विकल्या'चा आरोप 

नागपूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख व खासदार गजानन किर्तीकर, नागपूर जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रकाश जाधव यांनी पदाधिकारी पदांचा लिलाव करून विकल्याचा गंभीर आरोप काही शिवसैनिकांनी केला आहे.
किर्तीकर, जाधवांवर नागपूर शिवसेना `विकल्या'चा आरोप 

नागपूर : नागपूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख व खासदार गजानन किर्तीकर, नागपूर जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रकाश जाधव यांनी पदाधिकारी पदांचा लिलाव करून विकल्याचा गंभीर आरोप काही शिवसैनिकांनी केला आहे. 

नागपुरातील रामदासपेठमध्ये यासंदर्भात मोठा फलक लागल्याने नागपुरातील सेनेतील असंतोष बाहेर आला आहे. 

नागपूर शहर शिवसेना कार्यकारिणी नुकतीच घोषित झाली आहे. नवी कार्यकारिणी घोषित झाल्यापासून शहरातील अनेक शिवसैनिक नाराज आहेत. ज्येष्ठ शिवसैनिकांना डावलून नागपूर शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी खासदार प्रकाश जाधव यांनी आपल्या मर्जीतील लोकांना पदाधिकारीपदे दिल्याचा आरोप केला जात आहे. 

नागपुरातील रामदासपेठ भागात आज सकाळी मोठे फ्लेक्‍स लागले आहे. यात "होय, आम्ही विकली नागपूरची शिवसेना' या शीर्षकाखाली फ्लेक्‍स छापला आहे. या शीर्षकाखाली नागपूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख व खासदार गजानन किर्तीकर, नागपूर जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश जाधव व मुख्य समन्वयक अरविंद नेरकर यांची छायाचित्रे छापली आहेत. 

या फ्लेक्‍समध्ये "यांना विकली नागपूरची शिवसेना' या शीर्षकाखाली नव्या कार्यकारिणीतील सदस्यांचे छायाचित्र सुद्धा छापली आहेत. यात मंगेश कढव (शहरप्रमुख), नितीन तिवारी (प्रसिद्धीप्रमुख), राजू तुमसरे (शहर प्रमुख), रविनीश पांडे (उपजिल्हाप्रमुख), गुड्डू रहांगडाले (विधानसभा संघटक) यांची छायाचित्रे छापली आहेत. 

या नव्या कार्यकारिणीमुळे शिवसेनेतील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते नाराज झाले आहे. नवी कार्यकारिणीत जुन्या नेत्यांना डावलून शहरात चांगली प्रतिमा नसलेल्यांचा भरणा केल्याचा प्रामुख्याने आरोप केला जात आहे. यात केवळ सौदेबाजी झाल्याचा आरोप केला जात आहे. शहराच्या मध्यभागी हा फ्लेक्‍स कुणी लावला, याचे नाव मात्र या फ्लेक्‍सवर नमूद केलेले नाही. शिवसेनेतील असंतुष्ट गटाच्या लोकांनी हा फ्लेक्‍स लावल्याचे स्पष्ट आहे. या संदर्भात प्रतिक्रियेसाठी "सरकारनामा'ने नागपूर जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रकाश जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com