nagpur-satyajit-tambe-sevagram-peace-march-CWC-meet  | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

सेवाग्रामच्या "शांतता मार्च'मध्ये राहुल गांधींसह युवकांचा सहभाग : सत्यजित तांबे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

येत्या 2 ऑक्‍टोबरला सेवाग्रामला कॉंग्रेसतर्फे शांतता मार्च काढण्यात येणार आहे. यात राज्यातील युवक कार्यकर्त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर राहील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.

नागपूर : येत्या 2 ऑक्‍टोबरला सेवाग्रामला कॉंग्रेसतर्फे शांतता मार्च काढण्यात येणार आहे. यात राज्यातील युवक कार्यकर्त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर राहील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.
 
कॉंग्रेस कार्य समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक सेवाग्राम येथे 2 ऑक्‍टोबरला होणार आहे. या बैठकीपूर्वी जवळपास सात किलोमीटरचा शांतता मार्च काढण्यात येणार आहे. या मार्चमध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह कॉंग्रेस वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. या शांतता मार्चनंतर सीडब्ल्यूसीची बैठक होणार आहे. या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी सत्यजित तांबे सेवाग्राम गेले होते. 

सेवाग्रामहून परतल्यानंतर नागपुरात "सरकारनामा'शी बोलताना तांबे म्हणाले, महात्मा गांधी यांच्या जीवनाची माहिती व त्यांच्या जीवनाचा संदेश युवकांना अधिक आवश्‍यक आहे. महात्मा गांधी यांनी दाखविलेल्या अहिंसा व प्रेमाची शिकवण ग्रहण करण्याची सेवाग्राम शिवाय दुसरे कोणतेही योग्य स्थान या युवकांसाठी राहू शकत नाही. या शांतता मार्चमध्ये युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी आहेत.

संबंधित लेख