nagpur-rafeal-yashwant-sinha-cbi | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

`राफेल' गैरव्यवहारावर पांघरून घालण्यासाठी सीबीआय प्रमुखांवर दबाव; माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हांचा आरोप 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

राफेल घोटाळ्याची चौकशी रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची तडकाफडकी बदली केल्याचा खळबळजनक आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. पीएमओने बदलीसाठी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला असून त्यामुळे सीबीआयची विश्‍वासहर्ताही धोक्‍यात आली असल्याचा आरोप सिन्हा यांनी केला. 

नागपूर : राफेल घोटाळ्याची चौकशी रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची तडकाफडकी बदली केल्याचा खळबळजनक आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. पीएमओने बदलीसाठी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला असून त्यामुळे सीबीआयची विश्‍वासहर्ताही धोक्‍यात आली असल्याचा आरोप सिन्हा यांनी केला. 

नागपुरात वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार शत्रुघ्न सिन्हा, "आप'चे खासदार संजय सिंग, माजी आमदार आशिष देशमुख आदी उपस्थित होते. सिन्हा म्हणाले, की ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकाराचा दुरुपयोग करीत आहेत तशी परिस्थिती आणीबाणीच्या काळातसुद्धा नव्हती. मोदी आणि अमित शहा यांनी देशात अघोषित आणीबाणीच लावली आहे. या देशातील नागरिकांचा सीबीआयवर विश्‍वास होता. न्याय मिळत नसेल तर सीबीआय चौकशीची मागणी केली जात होती. मात्र आलोक वर्मा यांची बदली करून त्याऐवजी गुजरात कॅडरचे राकेश अस्थाना यांची नियुक्ती करण्यात आली. एक भ्रष्ट अधिकारी म्हणून अस्थाना यांची ओळख आहे. गुजरातच्या दंगलीवेळी अस्थाना यांनी मोदी आणि शहा यांना मदत केली होती. 

आलोक वर्मा यांनी राफेल घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या संजय सिंग, अरुण शौरी यांना भेटीसाठी वेळ दिला. त्यांचे निवेदन स्वीकारले. त्यामुळे पीएमओ नाराज झाले. ते घोटाळ्याचे पुरावे गोळा करीत आहेत, त्यानंतर गुन्हे दाखल करू शकतात अशी भीती वाटल्याने तकडाफडकी त्यांना हटविण्यात आले. त्यास अधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध असा देखावा निर्माण करण्यात आला. मात्र जनता मूर्ख नाही. योग्यवेळी ती मतदानातून आपला रोष व्यक्त करणारच आहे. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावण्यानंतर सत्तापालट झाली होती याकडेही यशवंत सिन्हा यांनी लक्ष वेधले.  
 

संबंधित लेख