Nagpur politics | Sarkarnama

बडोलेंनी मेणाच्या पुतळ्याशीच केले हस्तांदोलन 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 मे 2017

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मेणाच्या पुतळ्याशीच हस्तांदोलन केल्याने उपस्थितांमध्ये खसखस पिकली. 

नागपूर : सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मेणाच्या पुतळ्याशीच हस्तांदोलन केल्याने उपस्थितांमध्ये खसखस पिकली. 

नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सुनील्स सेलिब्रिटी वॅक्‍स म्युझियमचे सुनील कंडुल्लूर यांनी हा पुतळा तयार केला आहे. हा पुतळा 27 रोजी गडकरी यांच्या घरी ठेवण्यात आला होता. सोफ्यावर बसलेले गडकरी असा हा मेणाचा पुतळा तयार केला होता. अनेकांना या पुतळ्यामुळे बुचकाळ्यात टाकले. दूरून हुबेहूब गडकरी वाटत होते. यामुळे अनेकांची फसगत झाली. यातून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेही सुटले नाहीत. 

गडकरींना शुभेच्छा देण्यासाठी बडोले कार्यकर्त्यांसह आले. त्यांना अंगणात ठेवलेला मेणाचा पुतळा दिसला. परंतु त्यांना तो पुतळा मेणाचा आहे. याची ओळख पटली नाही. त्यांना प्रत्यक्षात गडकरी बसून असल्याचे वाटले. त्यांनी समोर जाऊन मेणाच्या पुतळ्याशी हस्तांदोलन केले. यावेळी बाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी या फिरकीचा हसून आनंद घेतला. बडोले यांना हा मेणाचा पुतळा असल्याचे समजल्यानंतर मात्र घरात जाऊन गडकरींशी प्रत्यक्षात हस्तांदोलन केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

संबंधित लेख