nagpur politics | Sarkarnama

अविनाश पांडेंचे दरबारी राजकारण 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 मे 2017

नागपूर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार अविनाश पांडे यांनी "दरबारी' राजकारणात आपण पुढे असल्याचे सांगत पुन्हा शहरातील प्रस्थापित नेत्यांवर मात केली आहे. अविनाश पांडे यांची महासचिवपदी नियुक्ती होऊन त्यांना राजस्थानचे प्रभारी नियुक्त केले आहे. 

अविनाश पांडे युवक कॉंग्रेसमधून समोर आलेले असून डॉ. श्रीकांत जिचकार यांचे विश्‍वासू म्हणून गणले जातात. ते 1985 मध्ये आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढविली नाही. परंतु दिल्लीतील दरबारी राजकारणात चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. या भरवशावर त्यांनी कॉंग्रेसच्या संघटनेमध्ये त्यांनी चांगलाच प्रभाव निर्माण केला आहे. 

गेल्या 30 वर्षांपासून खासदार राहिलेले विलास मुत्तेमवार, 25 वर्षांपासून आमदार राहिलेले सतीश चतुर्वेदी व 15 वर्षांपासून आमदार राहिलेले नितीन राऊत यांना नागपुरातील या नेत्यांना पक्षाच्या संघटनेतील पदांपासून दूर ठेवण्यात आले आहे. हे तिन्ही नेते गटबाजी करण्यात मश्‍गूल होते. एकमेकांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करण्यात व्यस्त राहणाऱ्या या नेत्यांकडे पक्षाच्या नेत्यांनी दुर्लक्ष करून या गटबाजीपासून दूर राहणाऱ्या अविनाश पांडे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. 

संबंधित लेख