nagpur politics | Sarkarnama

गोसेखुर्द गैरव्यवहारात तेलंगणाच्या नेत्यांवर गुन्हे 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

गोसेखुर्द प्रकल्पाच्या गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सात जणांवर गुन्हे दाखल केले आहे. यात तेलंगणाच्या तेलगू देशम पार्टीच्या (टीडीपी) नेत्यांचाही समावेश आहे. 

नागपूर : गोसेखुर्द प्रकल्पाच्या गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सात जणांवर गुन्हे दाखल केले आहे. यात तेलंगणाच्या तेलगू देशम पार्टीच्या (टीडीपी) नेत्यांचाही समावेश आहे. 

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या (व्हीआयडीसी) अंतर्गत असलेल्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील नेरला उपसा सिंचन योजनेत पेंढरी कालव्याचे मातीकाम व निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार करून 15 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप या आरोपींवर आहे. या आरोपींमध्ये तेलंगणातील टीडीपी नेते रामारेड्डी श्रीनिवासलु रेड्डी व श्रीनिवास कन्स्ट्रक्‍शन कंपनीचे भागीदार वेंकट रामाराव यांचा समावेश आहे. हे दोन्ही तेलंगणातील नेते आहेत. इतर आरोपींमध्ये सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता प्रभाकर मोरघडे, सेवानिवृत्त उपविभागीय लेखाधिकारी श्‍याम आंबुलकर, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता दिलीप पोहेकर, मूल्यांकन समितीचे अध्यक्ष सोपान सूर्यवंशी, कार्यकारी संचालक रोहिदास लांडगे अशी आरोपींची नावे आहेत. 

तेलंगणातील या नेत्यांच्या कंपनीने व्हीआयडीसीमध्ये नोंदणी केलेली नसताना कंत्राट मिळविले आहे. एसीबीने या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला. तेलंगणातील या नेत्यांवर एसीबीचे अधिकारी काय कारवाई करतात, हे लवकरच दिसून येईल. 

संबंधित लेख