nagpur politics | Sarkarnama

गडकरींचा सिमेंट कंपन्यांना दम 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

सिमेंट कंपन्यांनी दर वाढविल्यास कंपन्यांच्या मालकांना तुरुंगात जावे लागेल, असा दम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भरला आहे. 

नागपूर : सिमेंट कंपन्यांनी दर वाढविल्यास कंपन्यांच्या मालकांना तुरुंगात जावे लागेल, असा दम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भरला आहे. 

नितीन गडकरी अधिकाऱ्यांना दम भरण्यात आघाडीवर आहेत. आता कंपन्यांच्या मालकांनाही कक्षेत घेतले आहे. सध्या नागपुरात सिमेंटचे रस्ते व मेट्रो रेल्वेचे काम जोरात सुरू आहे. या कामासाठी सिमेंटची गरज मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. नागपुरातील काही रस्त्यांचे काम आता निधी अभावी संथगतीने सुरू आहे. सिमेंटची दर आणखी वाढल्यास या संथगतीला कासवगती प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. ही शक्‍यता लक्षात घेऊन नितीन गडकरींनी मिहानमध्ये फ्युचर ग्रुपच्या एका कार्यक्रमात बोलताना सिमेंट कंपन्यांच्या मालकांना तंबी दिली असावी, असे बोलले जात आहे. 

काही दिवसांपूर्वीच सिमेंटच्या दरात प्रती बॅगमागे 70 ते 80 रुपयांनी वाढ झाली आहे. याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला आहे. रस्ते बांधकामाच्या सपाटयामुळे गडकरींना "रोडकरी' असेही म्हटले जाते. सिमेंटच्या दरात वाढ झाली तरी रस्ते कसे होणार? या चिंतेतून गडकरींनी सिमेंट कंपन्यांना दम भरला असावा. आता गडकरींच्या या तंबीने सिमेंटचे दर वाढतात की, कमी होतात, हे काही दिवसांनी स्पष्ट होणार आहे. 
 

संबंधित लेख