नागपुरातील नगरसेवक भूमाफिया? 

नागपुरातील नगरसेवक भूमाफिया? 

नागपूर : धाकटदपटशाने भूखंड बळकावणाऱ्या नागपुरातील कॉंग्रेसचे नगरसेवक हरीश ग्वालवंशीला अटक करण्यात आली आहे. या कुटुंबाच्या सदस्यांवर यापूर्वी भूखंड हडपण्याचे आरोप झाले आहेत. 

ग्वालवंशी कुटुंबाची नागपुरातील हजारीपहाड या भागात गेल्या 30 ते 35 वर्षांपासून दहशत आहे. या दहशतीच्या जोरावर ते मध्यमवर्गीय व निम्नवर्गीय लोकांचे मोक्‍याचे भूखंड अत्यंत कमी दराने बळकवितात. त्यावर ते लाखो रुपये कमावतात. काही दिवसांपूर्वी हजारीपहाड भागातील भूपेश सोनटक्के या व्यक्तीने आत्महत्या केली. त्यांनी सुसाईड नोट मागे ठेवली होती. यातून ग्वालवंशी कुटुंबीयांच्या दहशतीचा भांडाफोड झाला. 

दिलीप ग्वालवंशी यांनी धमकी देऊन सोनटक्के यांचा भूखंड बळकाविला; परंतु त्या भूखंडांची पूर्ण रक्कम अदा केली नाही. त्यामुळे आर्थिक संकटात आलेल्या सोनटक्के यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. लोकांनी ग्वालवंशी कुटुंबियाविरोधात अनेक तक्रारी केल्याने पोलिस आयुक्त डॉ. वेंकटशेम यांनी विशेष गुन्हे अन्वेषण पथक (एसआयटी) स्थापन केले. यात नगरसेवक हरीश ग्वालवंशी दोषी आढळल्याने शनिवारी अटक करण्यात आली. 

राजकीय अभय 
ग्वालवंशी कुटुंबाला राजकीय अभय मिळत असल्याने ग्वालवंशी कुटुंबाची या भागात भूमाफीया म्हणून ओळख आहे. जवळपास 30 वर्षांपूर्वी गंगाप्रसाद ग्वालवंशी या भागात राहायला आले. त्यांनी पहिल्यांदा दुधाचा व्यवसाय सुरू केली. गाईच्या गोठ्यांसाठी व वैरण ठेवण्यासाठी ग्वालवंशी कुटुंबाने अनेक सरकारी भूखंड कब्जात घेतले. गंगाप्रसाद ग्वालवंशी यांचे सुपुत्र नीतिश ग्वालवंशी कॉंग्रेसचे नगरसेवक आहेत. मोहन ग्वालवंशी यांचा मुलगा हरीश ग्वालवंशी कॉंग्रेसचा नगरसेवक आहे. जगदीश ग्वालवंशी हे गंगाप्रसादचा भाऊ आहे. जगदीश ग्वालवंशी भाजपचे नगरसेवक आहेत. यामुळे दोन्ही पक्षामध्ये ग्वालवंशी कुटुंबाचे लागेबांधे असल्याने राजकीय संरक्षण मिळत आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com