Nagpur politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ वणवा 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

नागपूर : नागपुरातील मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या "रामगिरी'जवळील जंगलाला वणवा लागल्याने खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी केवळ तीन तासांमध्ये वणवा विझविण्यात यश मिळविले. 

नागपूर : नागपुरातील मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या "रामगिरी'जवळील जंगलाला वणवा लागल्याने खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी केवळ तीन तासांमध्ये वणवा विझविण्यात यश मिळविले. 

नागपुरातील पश्‍चिम भागात सेमिनरी हिल्स परिसरात "रामगिरी' आहे. या परिसरात उच्च न्यायालयाची इमारत, न्यायमूर्तींची निवासस्थाने व केंद्र सरकारची कार्यालये आहेत. "रामगिरी'च्या उत्तरेला वनविभागाची शेकडो एकर जमीन आहे. यावर झाडे-झुडपे आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जंगलात वणवा लागला. उन्हाळ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशमन दलाच्या माहिती दिल्यानंतर जवळपास 5 बंबांनी ही आग आटोक्‍यात आली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास तीन तास प्रयत्न करून ही आग नियंत्रणात आणली. 

जंगलातील हा वणवा होता की, कुणी कचऱ्याला आग लावली होती. याबाबत प्रशासनाने काहीही सांगितले नाही. उन्हाळ्यात असे प्रकार घडत असतात, असे अग्निशमन दलाच्या विभागाने सांगितले.

संबंधित लेख