nagpur politics | Sarkarnama

भाजपचा नागपुरातील तरुण नगरसेवकाचा मृत्यू 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 एप्रिल 2017

नागपुरातील भाजपचे तरुण नगरसेवक नीलेश कुंभारे यांचे आज अल्प आजाराने निधन झाले. 

नागपूर : नागपुरातील भाजपचे तरुण नगरसेवक नीलेश कुंभारे यांचे आज अल्प आजाराने निधन झाले. 
नीलेश कुंभारे नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 35 मधून निवडून आले. परंतु या 34 वर्षीय तरुणाला यशाचा आनंदही लुटता आला नाही. निवडणुकीनंतर काही दिवसांनी त्यांना ताप येत असल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु या आजाराने गंभीर रूप धारण केले. गेल्या काही दिवसांपासून ते कोमातच होते. आज सकाळी त्यांचे निधन झाले. ते महापालिकेत पहिल्यांदाच निवडून आले होते. बांधकाम व्यावसायिक असलेल्या कुंभारे यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात अल्पावधीतच आपल्या कामाची छाप सोडली होती. 

संबंधित लेख