nagpur-police-commissioner-upadhyay | Sarkarnama

नागपूरवरील `क्राईम कॅपिटल'चा ठपका पुसून काढू : पोलीस आयुक्त उपाध्याय 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

काहीजण नागपूर शहर "क्राईम कॅपिटल' असल्याचा आरोप करतात. या आरोपात फारसे तथ्य नाही. परंतु शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी `पब्लिक पोलिसिंग'वर आपला भर राहील, असे मत नागपूर शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
 

नागपूर : काहीजण नागपूर शहर "क्राईम कॅपिटल' असल्याचा आरोप करतात. या आरोपात फारसे तथ्य नाही. परंतु शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी `पब्लिक पोलिसिंग'वर आपला भर राहील, असे मत नागपूर शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
 
नागपूर शहराचे पोलिस आयुक्त म्हणून आज डॉ. उपाध्याय यांनी पदभार स्वीकारला. गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात गुन्हेगारीच्या गंभीर घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर शहर क्राईम कॅपिटल झाल्याचा आरोप केले आहेत.

या आरोपांबद्दल बोलताना डॉ. उपाध्याय म्हणाले, की नागपूर शहराला क्राईम कॅपिटल म्हणणे योग्य नाही. परंतु शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी निश्‍चितपणे प्रयत्न केले जाईल. यासाठी लोकांशी जास्तीतजास्त संपर्क करण्यावर आपला भर राहणार आहे. ठाण्यांमध्ये राहण्यापेक्षा पोलिस रस्त्यावर लोकांच्या संपर्कात राहीला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. 

शहरातील शांतता एकदम भंग होत नाही. त्यामागे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली प्रक्रिया कारणीभूत ठरते. जनमानसांचा एकदम विस्फोट झाल्यानंतर त्यावर नियंत्रण आणणे पोलिस दलाला कठीण जाते. यासाठी पोलिस लोकांशी जास्तीतजास्त संपर्कात राहील. हा प्रयोग सोलापूर शहरात केला. त्या शहरात यश मिळाले. सोलापूरमध्ये गेल्या दोन वर्षात एकही दगडफेकीची घटना घडली नाही. अशा प्रयत्नातून जनमानसाची माहिती मिळत जाईल. शहर शांत ठेवण्यासाठी लोकांच्या सहभागाची अधिक गरज असल्याचे डॉ. उपाध्याय यांनी सांगितले. 

डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी डॉ. के. वेंकटशम यांच्याकडून पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख